Breaking News

परिवर्तनवादी स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

बीड : परिवर्तनवादी स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो तरुणांनी रक्तदान करून आत्मारामजी चांदणे यांना अभिवादन करण्यात आले.

परिवर्तनवादी स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांचा सामाजिक- राजकिय चळवळीमध्ये ठसा होता. DPI डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया मार्फत 2004 ला वामनदादा कर्डक यांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने समाज हितासाठी व गरजू रुग्णांसाठी त्यांनी स्वतः हा रक्तदान सुरू केले. त्यांचं म्हणणं अस होत की, जगात सर्व काही तयार होतंय. परंतु रक्त हे कुठंही तयार होत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्त देऊन रुग्णसेवा केली पाहिजे. त्यांचीच प्रेरणा घेऊन 2011 पासून त्यांच्या जन्मदिवस/जयंतीनिमित्त दरवर्षी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या रक्तदान शिबीर घेण्यात येत असून यंदाही अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर गुरुवारी (दि.10) आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शेकडो तरुणांनी रक्तदान करून आत्मारामजी चांदणे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डीपीआयचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोनके, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल पाटोळे,आनंद चांदणे, अभिमन्यू चांदणे,नितीन पाटोळे,योगेश चांदणे इ,असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments