Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी लावले झाडे !

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरुर कासार नगपंचायतचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोर सानप यांनी आज 5 जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरुर शहरात झाडे लावुन पर्यावरण दिन साजरा केला. या वेळी शिरुर नगपंचायतचे माजी नगराध्यक्षपती दत्ता पाटील गाडेकर. माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे.शिवसेना युवा नेते मनोज परदेशी.नगपंचायतचे राष्ट्रवादी काॕग्रेसचे गट नेते नशिर शेख.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अकुंश शिंदे.नगपंचायत लेखापाल चंद्रकांत दामोदर.राष्ट्रवादी काॕग्रेसचे युवा नेते अमोल चव्हाण.सावता कातखाडे.कौसर शेख.नामदेव घुगेव इतर कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर नगपंचायतने शिरुर शहरातील सिध्देश्वर मदिंर.थोरात वस्ती.तहसिल कार्यालय.नगपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद शाळा.तहसिल जवळील पाण्याची टाकी.कपिलेश्वर मंदीर.आणि शिरुर शहरातील परिसरामध्ये आदी ठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत.नगपंचायतने बीज बॕंक उपक्रम देखीलसुरु केला आहे.नगपंचायत बीज बॕक मध्ये शहरातील लोकांकडुन त्यांच्याकडे ज्या झाडांच्या बीया उपलब्ध असतील त्या जमा करुन त्या बियापासून झाडे बनविण्याचे काम करणे सुरु आहे.शहरातील लोकांकडे.आंब्याच्या कुया.चिंचोंके.किंवा ज्या बीया असतील त्या घेवुन त्यांचे झाडे तयार करुन डोंगरावर लावण्यात येणार आहे.

त्याच्यासोबतच नगपंचायतने 1500. सिड बाॕल देखील तयार केले आहेत ते ही डोंगराळ भागात.माळराणात पावसाळ्यात टाकून झाडे उगवण्यासाठी त्याची मदत होणार आहे.आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त वृक्षारोपन करुन 4000 हजार झाडे लावण्याचे सुरु आहे.नवीन पाण्याच्या टाकी जवळ अटल घनवन म्हणून 2000 झाडे लावण्याचे काम सुरु आहे,जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त झाडे लावण्याची सुरूवात करण्यात आली असून यामध्ये वड.पिंपळ.पेरु,जांभुळ.लिंबू.आंबा.ही झाडे लावण्यात येत आहेत.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन झाडे लावुन त्याचे संगोपनही करावे.भविष्यात हिच झाडे तुम्हाला आॕक्सिजन.सावली.व फळे देतील.त्यामुळे झाडे व झाडे जगवा असे नगपंचायतचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी जागतिक पर्यावरण दिना निमित्त जनतेला आवाहन केले आहे. 


No comments