Breaking News

बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला संपन्न


बीड
:  प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड आयोजित तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या 2565 व्या जयंती निमित्ताने ऑनलाइन बुद्ध पोर्णिमा महोत्सव 2021 निमित्त  पाच दिवशीय व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते.

 ही व्याख्यानमाला दि. 25 मे ते 29 मे 2021 रोजी मुख्य संयोजक पु.भिक्खु धम्मशील (सचिव)व आयु.प्रा. प्रदीप रोडे (उपाध्यक्ष) प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड. यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक संकल्प फेसबूक लाईव्ह व गुगल मीट द्वारे प्रक्षेपित झाली. यावेळी प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महाथेरो,मुळावा.पु.डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, पूर्णा. पु. भिक्खु धम्मधर थेरो, जालना.पु.भिक्खु एन. धम्मानंद, औरंगाबाद.पु.भिक्खु धम्मशील,  हिंगोली/बीड. यांनी प्रमुख अतिथी म्हणून आपले मत व्यक्त केले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी दर्शवलेला धम्माचा मार्ग म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख, शांती व आनंद देणारा मार्ग आहे. आपल्याप्रमाणेच इतरांचेही सर्व सुखकारक मार्ग असणार याची प्रचिती देणारा मार्ग म्हणजे 'मध्यम मार्ग'आहे. द्वेषाची भावना मनामध्ये नसणारा व्यक्ती मध्यम मार्गाचा पाईक असतो, तसेच कोणत्याही जात, धर्माचा वा पंथाचा, कुळाचा व विभिन्न मानल्या जाणाऱ्या समाजाचा व्यक्ती असो, अशा व्यक्तीच्या मनात इतर कोणत्याही मानवानं बद्दल द्वेष न बाळगणारा व्यक्ती म्हणजे तो मध्यम मार्गाचा पाईक आहे असे समजावे. राज वैभव सर्व संपन्न ऐश्वर्य प्राप्त जीवन त्यागून तथागत सम्यक संबुद्धा नी बोधिसत्वा चा मार्ग स्वीकारला तो मार्ग प्रत्येकाच्या जीवनातील सम्यक मार्ग आहे. सम्यक दृष्टी सम्यक संकल्प हा मानवाला नवा मार्ग दाखवते. सर्वांनी मिथ्या, वाणी, कर्म, एकाग्रतादृष्टी सर्व काही त्यागुन बुद्ध मार्गाचा स्वीकार केला पाहिजे तरच आपणाकडे सर्व एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतील. ज्यांनी आपल्याला घडवण्यासाठी कष्ट साहिले अशा आई-वडिलांची सेवा नम्रतेने केली पाहिजे. 

आईच्या दुधाचे कर्ज वडिलांच्या उपकाराची फेड जगात कोणीही करू शकत नाही. सर्व वाईट मार्गाचे कर्म त्यागून योग्य मार्गाने पदार्पण करणे व शीलाचे पालन करणे म्हणजे सर्वांगीण विकासाचा सुखकारक मार्ग आहे. प्रत्येकाने आपल्या प्रति जागृतीची भावना ठेवून यश अपयशाची पर्वा न करता नियमित प्रयत्नवादी असणे गरजेचे आहे. ध्येय प्राप्ती होईपर्यंत मागे न सरणे म्हणजे विकास मार्गावर असलेल्या समान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाचा उत्साह होता,परिस्थिती बदलण्याची जिद्द होती,कुशल कर्माचा छंद होता, म्हणून समाज उद्धाराचा संकल्प त्यांनी हाती घेतला व तो मार्गी ही  लावला. मानव कल्याणाचा मार्ग हा केवळ तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मात आहे हे ओळखून व खात्री करून 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला व सर्वांना या मार्गाचा स्वीकार करण्यास आवाहन केले. अशा अनेक मानव कल्याणकारी विचाराने प्रबोधित करून बुद्धाच्या धम्माचे विचार विस्तृतपणे समजावून सांगितले.

   यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी केले. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून धम्म उपासक-उपासिका व धम्मा अनुयायायी या व्याख्यानमालेचा लाभ घेत होते. ऑनलाईन सर्व उपस्थितांचे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पु.भिक्खु  धम्मशील (सचिव), आयु.प्रा.प्रदीप रोडे (उपाध्यक्ष) व प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 


No comments