Breaking News

पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार

परळी वैजनाथ : परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे हे पोलिस दलातील प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले तसेच सप्तनिक त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्मचार्यांच्या वतिने निरोप समारंभाद्वारे निरोप देण्यात आला.तर प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन मारुती मुंडे यांनी पदभार स्वीकारला.

       शिवलाल पुरभे यांनी आतापर्यंत  गडचिरोली, औरंगाबाद, नागपूर, बीड व अन्य ठिकाणी पोलिस निरीक्षक म्हणुन सेवा बजावली तर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात ते मागील सोळा महिन्यापासुन रुजु होते.एक कर्तव्यदक्ष व कर्मचार्यांना सोबत घेवुन काम करणारे अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती होती.ग्रमीण पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांच्या वतिने छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते, पोलिस सहाय्यक निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक मनोज जिरगे,  पोलिस नाईक हरिदास गिते, शिवाजी गोपाळघरे, विष्णु घुगे, श्रीधर मुंडे, उत्तम मदने, अंबाड, कोकाटे, केकान, नारायण काकडे, महिला कर्मचारी गजबहार, ढोले, करवंदे,चालक बळवंत, ढवळे, घोडके, कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शिवलाल पुरभे म्हणाले की,परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात रुजु झाल्यानंतर येथील अधिकारी व कर्मचार्यांनी व जनतेने कायम सहकार्य केल्याने चांगले काम करु शकलो.तर पदभार घेतल्यानंतर पो.नि.मारुती मुंडे यांनी सध्याच्या संकटकाळात कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवत शांतता कायम ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले. कोरोनाच्या काळात ग्रामीण पोलिस स्टेशनला सार्वजनिक बांधकाम विभागाचे चालक मंचक धायगुडे मामा यांचा सेवानिवृत्तबद्दल सप्तनिक सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याचे फौजदार म्हणून पदोन्नती झालेले तुकाराम बोडके यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन स.पोनि विशाल शहाणे तर आभार जिरगे यांनी केले. 


No comments