Breaking News

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करा : भिम आर्मी


फिर्यादीला हाताशी धरून खोट्या गुन्हात अडकवणार्यावर कठोर कारवाई करून खोटे नाटे गुन्हे मागे घ्यावेत

 भिम आर्मी, भारत एकता मिशनचे बीड जिल्हा प्रमुख सिध्दार्थ मायंदळे यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव यांना  निवेदन

 

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील  दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या हद्दीत संगम ता धारूर  येथील माहेरी  आलेल्या बौद्ध महिलेवर पाठीमागून हात धरून सरपंच पति अंकुश तिडके यांनी   विनयभंग केल्याने आनुसुचित जमाती अंतर्गत गुन्हा दि 1/6 / 2021रोजी दिंद्रुड पोलिस ठाण्यात  दाखल केला. याचा मनात राग धरुन आरोपीची पत्नी भोपा ता.धारूर या गावची  सरपंच आसुन दुसर्‍या दिवशी दि. 2/6/2021 खोटे नाटे करून विनयभंग व  दरोड्यासारखे गंभीर स्वरूपाचे  पिडीतेच्या कुटुंबातील सदस्यांवर  गुन्हे दाखल केले आहेत. वस्तुत स्थिती पाहता या दिवशी पिडीतेचे कुटूंब हे शेतात खतपाणी घालत होते. खोट्या  फिर्यादीला हाताशी धरून संबंधित पोलिसा स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल केला आहे.   

तरी या बौद्ध कुटुंबावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन अनुसूचित जाती जमाती अंतर्गत  प्रतिबंध या कायद्यानुसार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कठोर  कारवाई करावी .  जर दि 8/ 6/2021 पर्यंत खोटे नाटे गुन्हे वापस नाही घेतले तर जिल्हाभर आदोलन करण्याचा ईशारा सिध्दार्थ मायंदळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 


No comments