Breaking News

थकीत करावरील दंडव्याज आणि कोरोनाच्या लॉकडाउन कालावधील सर्व कर माफ करावेत - शिवसंग्रामची पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


बीड  ः- बीड शहरातील अनेक दूकानदार आणि नागरीक यांनी शिवसंग्रामचे आ. विनायकरावजी मेटे  यांची भेट घेवुन थकीत करावरील दंड व्याज अव्वाच्या सव्वा स्वरूपात बीड नगर परिषद  लावत आहे  तसेच कोरोना महामारीच्या लॉकडाउन काळातील सर्व प्रकारचा कर नगर परिषदेने माफ करावा अशी विनंती आ. विनायकरावजी मेटे यांच्याडे केलेली आहे.
बीड शहरातील व्यवसाईक व नागरीक यांना अडचणीच्या काळात आपल्याला फक्त आ. विनायकरावजी मेटे   हेच मदतीला धावुन येतील असा विश्वास  कायम येत आहे. हेच या नागरीकांच्या भेटीमुळे सिध्द झााले आहे. आ. विनायकरावजी मेटे  यांनी शिवसंग्राम बीड शहर कार्यकारणीला आदेश देवुन मुख्याधिकारी नगर परिषद यांना विनायकरावजी मेटे  यांच्या आदेशावरून आज शिवसंग्रामच्या शहर कार्यकारणी शहर अध्यक्ष लक्ष्मण ढवळे,  जिल्हा सरचिटणी अनिल घुमरे, सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,  युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, युवक शहरउपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, अर्जुन यादव व इतर कार्यकर्त्यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्षजी गुटृे यांना त्यांच्या दालनात निवेदन देवुन थकीत करावरील दंड व्याज व लॉकडाउन कालावधीतील सर्व व्याज माफ करण्याचे निवेदन दिले.
तसेच बीड शहरातील अनेक गंभीर समस्या बाबत मुख्याधिकारी यांना कल्पना देवुन त्या सोडविण्या बाबत आग्रह धरला. शहरातील अनेक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य परसलेले आहेत त्या बाबतीत लक्ष घालुन शहर स्वच्छ करण्यात यावे अशीही मागणी या वेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली. शहरातील प्रभागातील अनेक ठिकाणी कचराकुंडी नाही, गटारी तुंबलेल्या आहेत, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही या कडे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले व येत्या पावसाळयात या सर्व समस्या दुर करणे बाबत  शिवसंग्रामच्या वतीने विनंती करण्यात आली. बीड शहरातील नागरीकांच्या मुलभूत सोईसुविधा नगर पालीका प्रशासनाने पूर्ण कराव्यात अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने येत्या काळात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम बीड शहर कार्यकारीनीच्या वतीने देण्यात आले.

No comments