Breaking News

मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.कालिदास नारायणराव पवार सेवानिवृत्त

परळी :  मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.पवार के.एन हे 33 वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार आज दिनांक 31 मे 2021रोजी सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी मिलिंद माध्यमिक विद्यालयात कोव्हीड-19 संबंधीत सर्व नियम पाळून निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री  अनंतरावजी जगतकर साहेब, संस्थेचे विश्वस्त गवले साहेब,दासू वाघमारे सर, मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मोजकेच आजी माजी कर्मचारी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पवार सरांनी आपल्या 33 वर्षातील प्रदिर्घ सेवाकाळातील आनंददायी अनुभवांच्या आठवणी या प्रसंगी व्यक्त केल्या. त्यांनी सहकारी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबाबत समाधान व्यक्त करत जेष्ठ शिक्षक या नात्याने सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक श्री.कोंम्मावार आर.जी. यांनी केले. पवार सरांना शुभेच्छा देत पुढील आयुष्य आरोग्यदायी , सुखसमाधानाचे जावे अशी मनोकामना व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय अनंतरावजी जगतकर साहेब यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात पवार सरांच्या सेवाकाळाचे कौतुक करत शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत शाळेच्या विकासाचा चढता आलेख  कायम ठेवण्यात माझ्या सर्व कर्मचार्यांचे कठोर परिश्रम आहेत हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. वरिष्ठ शिक्षकांनी मिलिंद विद्यालय नावाच्या या छोट्या रोपट्याचे रूपांतर  वटवृक्षात केले. शासनाच्या नियमानुसार नियत वयोमानाने हे माझे वरिष्ठ शिक्षक सेवानिवृत्त होताना पाहून मनाला खूप वेदना होतात असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे तथा संस्थेचे अध्यक्ष अनंतराव जगतकर साहेब यांनी पवार सरांना सेवासमाप्तिचे संस्थेचे पत्र देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन कांबळे सर यांनी केले तर आभार कदरकर सर यांनी मानले. 


No comments