Breaking News

परळीच्या पत्रकारांनी पोलीस उप अधीक्षक सुनील जायभाये यांचा केला सत्कार

परळी : अंबाजोगाई विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुनील जायभाय यांनी कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याने परळी येथील पत्रकारांच्या वतीने त्यांचा बुधवारी (दि.९) सत्कार करण्यात आला. 

अंबाजोगाई विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुनील जायभाय यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर औरंगाबाद रुग्णालयात उपचार घेत होते.  सुनील जायभाय यांनी Covid 19 वर मात करून ते सेवेत पुन्हा रुजू झाले. यामुळे त्यांचा परळीमधील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गिते  तसेच पत्रकार दिलीप बद्दर,संजय खाकरे,फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे ,माणिक कोकाटे, महादेव शिंदे, कैलाश डुमने याच्या वतीने  शुभेच्छा दिल्या. 


No comments