Breaking News

लालपरी सोमवारपासून पुन्हा धावणार

परळी :  मागील दीड महिन्या पेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेली बस सेवा सोमवार दिनांक 7 जून 2021 पासून सुरू होत आहे. कोरोना महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे बीड जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. बीड जिल्ह्यात कोरोना चा मोठया प्रमाणात उद्रेक झाला होता. सोमवारपासून बस सेवा कोरोना च्या सर्व नियमांचे पालन करून पूर्ववत होत असल्याचे परळी बस स्थानकाचे आगार प्रमुख प्रवीण बोंडवे यांनी कळविले आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यात कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. तसेच कोरोना च्या वाढत्या शिरकावामुळे लाल परी ची सेवाही खंडित करण्यात आली होती. आता सोमवार दिनांक 7 जून 2021 रोजी पासून लाल परी ची सेवा पूर्ववत करण्यात येत असून कोरोना च्या सर्व नियमांचे पालन करून सदरील बससेवा सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातुन या मार्गावर धावणार  बसेस:- 

परळी आगार:-बीड, परभणी, लातूर, अंबाजोगाई, नांदेड, सोनपेठ.

बीड आगार:- परळी, नांदेड, परभणी, अंबाजोगाई, लातूर,औरंगाबाद,जालना, सोलापूर, पुणे, मुंबई.

धारूर आगार:-बीड, अंबाजोगाई, केज, तेलगाव, पुणे.

माजलगाव आगार:- लातूर परळी परभणी नांदेड सोलापूर कोल्हापूर बीड मुंबई गेवराई आष्टी

गेवराई आगार:- माजलगाव परभणी नांदेड शेगाव पुणे जालना औरंगाबाद

पाटोदा आगार:- बीड, परळी, पुणे, मुंबई.

आष्टी आगार:-पुणे ( स्वारगेट), नगर, मुंबई. अंबाजोगाई आगार:- बीड, परळी, औरंगाबाद, लातूर, अहमदनगर, परभणी, पुणे, धारूर.

परळी आगारातून सोमवार दिनांक 7 जून 2021 रोजी पासून बीड, परभणी, लातूर, अंबाजोगाई, नांदेड, सोनपेठ, आदी मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी  मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच बस सेवा सुरु करण्यात येत आहे.

प्रवीण बोंडवे

आगार प्रमुख

परळी वैजनाथ बस स्थानक

No comments