Breaking News

वृध्द, निराधारांना मायेचा घास नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राचा उपक्रम

गौतम बचुटे । केज 

"जे का रंजले वा गांजले l त्यासी जो म्हणे आपुले ll तोचि साधू ओळखावाl देव तेथेचि जाणावा ll "अगदी हे संत वचन केज तालुक्यात नव्हे तर दीड वर्षांपासून कोरोना संकटात संपूर्ण बीड जिल्ह्यात गरीब व गरजवंत कुटुंबाना आणि त्यांच्या मुलां-बाळांच्या तोंडात दोन घास समाधानाने भरवले जावे म्हणून बीड जिल्ह्यात अहोरात्र राबणाऱ्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सौ. मनिषाताई घुले करीत आहेत आता त्यांनी वृद्ध व निराधांसाठी अन्नछत्र सुरू केले आहे. समाजसेवेचा आव आणणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

बीड जिल्ह्यात नवचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या माध्यमातून मनिषाताई घुले या त्यांचे सहकारी कांबळे मॅडम, ज्योती सांबरे आणि महादेव जोगदंड यांच्या सहकार्याने महिला व पीडितांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. त्यानी आता पर्यंत कोरोना जनजागृती ते लोकांना मास्क, सॅनिटायझर वाटप आणि गरजवंत मजूर व अल्पभूधारक कुटुंबासाठी किराणा सामानाचे वाटप केले आहे. मात्र या परिस्थितीत वृद्ध आणि निराधार कुटुंबातील असहाय्य लोकांच्यासाठी ज्यांना स्वयंपाक-पाणी करता येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी त्यांनी केज तालुक्यातील भाटुंबा, कुंबेफळ आणि कानडी बदन येथे अन्नछत्र सुरू केले आहे. या उपक्रमा अंतर्गत सकाळी फराळ व जेवण आणि त्यातही पोषक  अशासाठी त्यांनी घरपोहोच  डब्बे वाटप केले जातात. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी सारिका जोगदंड, आश्रूबाबाई थोरात, सत्यवती चटप, दिपाली साखरे, दैवशाला पांचाळ या परिश्रम घेत आहेत.No comments