Breaking News

धार्मिक स्थळे खुली करा; ॲड. शेख शफिक भाऊंचे जिल्हाधिकारींना निवेदन

बीड :  राज्यात सकाळी ७ ते दुपारी दुपारी ४ वाजेपर्यंत लॉक डाऊन चे निर्बंध शिथिल करुन बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र धार्मिक स्थळांना अद्यापही खुले करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणून धार्मिक स्थळे सुद्धा खुली करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना आतापर्यंत अनेक निवेदन दिली असे एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊंनी म्हटले आहे.
      याविषयी दिलेल्या पत्रकातून आपले मत मांडताना त्यांनी नमूद केले आहे की, एआयएमआयएम पक्ष लॉक डाऊन मुळे सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सुरुवातीपासून निवेदनाच्या माध्यमातून सातत्याने शासन-प्रशासनाकडे मांडत आहे. यात धार्मिक स्थळांनाही खुले करण्याची  मागणी सुरुवातीपासून करीत आहे. याकरीता शासन-प्रशासनाकडे आतापर्यंत अनेक निवेदने ही दिली आहेत. नुकतेच काही उद्योगांना सोमवार दिनांक ७ जून पासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे सर्वसामान्य गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या जनतेसह छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शासन-प्रशासनाने दिवसातून नऊ तास का होईना बाजार पेठ उघडण्याची परवानगी दिल्याने लोकांचे होत असलेले हाल काही प्रमाणात तरी कमी होतील. परंतु अजूनही धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. 
धार्मिक स्थळे मग ते मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे कोणतीही असो तिथे जाऊन प्रत्येक धर्माचा अनुयायी हा स्वतः सह इतरांसाठीही प्रार्थना करतो, दुवा मागतो. जवळपास दीड वर्षांपासून कोरोना रुपी महामारी ने जगभरात थैमान घातल्याने त्यातून आपला देश ही सुटलेला नाही. यातून मुक्त होण्याकरिता शासन-प्रशासन, आरोग्य विभाग, सर्व राजकीय पक्ष स्वतःला झोकून देऊन कार्य करीत आहे. यासह कोरोना पासून मुक्तता व्हावी याकरिता प्रत्येक धर्म बांधवांना आपल्या परमेश्वर, अल्लाह, गॉड, वाहेगुरू यांच्याकडे यांच्याकडे प्रार्थना करता यावी, दुवा मागता यावी म्हणून धार्मिक स्थळे ही काही निर्बंधांसह दर दिवशी खुली करण्यात यावी. जेणेकरून प्रत्येक धर्म बांधवाला आपापल्या धार्मिक स्थळात जाऊन कोरोना पासून सुटकेसाठी प्रार्थना करता येईल, दुवा मागता येईल. शिवाय  धार्मिक स्थळाबाहेर आपले छोटे-छोटे उद्योग करणारे  फुल, हार, नारळ, उदबत्त्या,  शिरणी वगैरे विकणार्‍यांच्या व्यवसायाचा सुद्धा विचार करावा आणि धार्मिक स्थळे खुली करावी. असे आवाहन एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी केले आहे.
पान दुकानांना ही सुरू करण्याची परवानगी द्यावी
 ७ जून पासून जवळपास सर्व उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यातून पान दुकानांना वगळण्यात आले आहे. पान दुकानदार हे अत्यंत तुटपुंज्या आमदनी वर आपला व्यवसाय चालवितात. जवळपास दीड वर्षापासून लॉक डाऊन मुळे तेही रोजगारा विना पुरते हतबल झाले आहेत. सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली तशी पान दुकानदारांना ही त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. आणि त्यांचे हाल थांबवावे. असेही ॲड. शेख शफीक भाऊंनी म्हटले आहे.

No comments