Breaking News

तृतीयपंथी गौरी शिंदेने जपली सामाजिक बांधिलकी केजमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांना केले मास्कचे वाटप

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तृतीयपंथी गौरी शिंदे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर विनामस्कचे फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर हे महत्वाचे घटक आहेत. मात्र आता लॉक डाऊनमध्ये थोडी ढील देताच नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पुन्हा आणखी कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि संसर्ग टाळण्यासाठी केज येथे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या तृतीयपंथी गौरी शिंदे यांनी रस्त्यावर फिरणारे पादचारी, दुचाकी चालक आणि वाहनचालक यांना मास्क वाटप केले. गौरी शिंदे या विविध सामाजिक चळवळी, महिलांचे व उपेक्षित घटकांचे विविध प्रश्न आणि त्यांच्या समस्या या विरोधात वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होत असतात. त्यांच्या या मास्क वाटप करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या सामाजिक जाणिव आणि बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


No comments