Breaking News

पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढल्याबद्दल तरुणांकडून आ. विनायक मेटे यांचा सत्कार

बीड : मराठा आरक्षण आणि मराठा विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून बीडमध्ये राज्यातील पहिला मोर्चा काढून तो यशस्वी केल्याबद्दल बीडमध्ये मराठा तरूणांकडून आ. विनायक मेटे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देऊ, असे अश्वासन या तरुणांनी आ.मेटे यांना दिले. 

आ.विनायक मेटे यांनी बीडमध्ये शनिवारी (दि.5) भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चाला बीडच्या मराठा क्रांती मोर्चानेही पाठींबा दिला होता. स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देखील बीडमध्ये येऊन गावोगाव बैठका घेतल्या. आ.मेटे यांनीही प्रत्येक तालुक्यात जाऊन मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकण्यात राज्य सरकारची नेमकी काय चूक झाली, हे तरुणांना पटवून दिले. त्यामुळे जिल्हाभरातून बांधव मोठ्या संख्येने बीडमध्ये आले होते. मोर्चेकर्‍यांना मोर्चास्थळी मास्क आणि सॅनीटायझरचे देखील वाटप करण्यात आले. हळदीचे दूध, पाणी यांची देखील सोय करण्यात आली होती. अत्यंत नियोजन पुर्वक हा मोर्चा झाल्याने, कायदा सु व्यवस्थेला कुठेही गालबोट लागू न देता शांततेत हा मोर्चा संपन्न झाला. त्यामुळे आ.विनायक मेटे यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज जाधव, हरीष शिंदे, शैलेश सुरवसे, सुर्यकांत रसाळ, शिवराम शिरगिरे, नवनाथ काशीद आदींची उपस्थिती होती. 


No comments