Breaking News

वसंतनगर येथे वनपरिक्षेत्र परळीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण शुभारंभ

परळी वैजनाथ :    तालुक्यातील वसंतनगर जवळील सामाजिक वनीकरण विभागाच्या परिसरात आज शनिवार दि.05 मे रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी वृक्ष लागवडी बरोबर संगोपन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गित्ते यांनी केले आहे. 

        जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभाग बीड व वनपरिक्षेत्र कार्यालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. परळी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गित्ते साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गित्ते, वनपाल राठोड, वनपाल कस्तुरे,लटपटे साहेब , वनरक्षक व्हि.एम.दौंड, वनरक्षक बी.जे.नागरगोजे, वनरक्षक बिल्पे, दहिफळे तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समिती वसंतनगर अध्यक्ष कुंडलिकराव जाधव तसेच वसंतनगर ग्रामस्थ उपस्थित होते. वसंतनगर येथील वनक्षेत्रात गेली दोन वर्षात वनविभागाने 60 हजार वृक्षांची यशस्वी लागवड केली आहे. तरी आज दि.05 जून रोजी जागतिक पर्यावर दिनानिमित्त अजून 30 हजार विविध प्रजातीचे वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच 30 हजार वृक्षांची घनवृक्ष लागवड करून ती यशस्वीरित्या जोपासली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी एल. गित्ते यांनी सांगितले आहे.  प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करून ती वृक्ष चांगल्या प्रकारे जोपासली पाहिजीत तसेच वृक्षलागवड केल्याने परिसर हिरवागार होईल व  पावसाचे प्रमाण देखील वाढेल तसे प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गित्ते यांनी केले आहे.


 


No comments