Breaking News

सर्पमित्रांच्या सहाय्याने सापाला जीवदान


परळी : येथील शक्तीकुंज वसाहतीतील रहिवासी श्रीगणेश मुंडे यांच्या घरात आज दि.9 रोजी साप निघाल्याने गोंधळ उडाला होता.सर्पमित्र ॠषीकेश राऊत यांनी या सापाला पकडुन सुरक्षित ठिकाणी सोडत जीवदान दिले.

   श्रीगणेश मुंडे यांच्या घरी अचानक विषारी साप निघाल्याने घरातील सदस्य घाबरुन गेले होते.ही बाब ॠषीकेश राऊत व  भूषण पाठे,अधिकारी महानिर्मिती यांना कळविल्यानंतर दोघेही मुंडे यांच्या घरी येवुन राऊत यांनी हा साप पकडला.यावेळी प्राणी मित्र राज जाधव व इतर उपस्थित होते. 


No comments