Breaking News

तमाशा कलावतांच्या मुलांना आम्ररसाची मेजवानी

 


कुंडलिक खांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने दिली आंब्याची मेजवानी!

 बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर कासार

शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने अजिनाथ खेडकर व सौ.रंजना खेडकर या दांपत्याने जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हनाथ येळंब येथील असणाऱ्या गोरं गरीब तमाशा कलावंतांच्या मुलांना आम्ररसाची मेजवानी देण्यात आली. 

बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना काळात रक्तदान शिबीर,वृक्षरोपण, रुग्णांना फळे वाटप असे सामाजिक कामे करून शिवसेनेचा वारसा जपला असून आज शिरूर कासार येथील शिवसैनिक अजिनाथ खेडकर व त्यांच्या पत्नी शिक्षिका सौ. रंजना खेडकर यांनी ब्रम्हनाथ येळंब येथील तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी आम्ररसाची मेजवानी दिली यावेळी मुलांना आंब्याचा देखील आस्वाद या दांपत्याने दिला आहे. No comments