Breaking News

कोरोनावर मात करणाऱ्या योद्द्यांचा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला सत्कार

गौतम बचुटे । केज

केज येथिल पिसेगावच्या कोव्हीड केंद्रात उपचार घेऊन दुरुस्त झालेल्या रुग्णांचा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सत्कार करून त्यांना निरोप दिला.

केज येथिल पिसेगाव येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण बीड आगाराचे वाहक बलभीम बचुटे, त्यांचा पुतण्या रितेश व सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम बचुटे हे मागील आठवड्या पासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत होते. या केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. आसाराम चौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ताराळकर व डॉ. सोनवणे मॅडम यांच्या देखरेखीखाली वेळोवेळी तपासणी, योग्य आहार, व्यायाम, योगा, औषधोपचार उपचार  व पूरक आहार या बरोबरच कर्मचाऱ्यांनी केलेली शुश्रूषा आणि रुग्णासोबतच त्यांची सकारात्मक दृष्टिकोन. यामुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. तसेच रुग्ण आणि डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांशी जुळलेले ऋणानुबंध यामुळे रुग्णांची प्रकृती  व तब्बेतीत लवकर सुधारणा होत आहे.

दरम्यान दि.३ मे रोजी बलभीम बचुटे, ज्योतिराम बचुटे व रितेश बचुटे यांना केंद्रातून सुट्टी होताच नोडल अधिकारी डॉ. आसाराम चौरे, डॉ ताराळकर, डॉ. सोनवणे मॅडम, पोलीस कर्मचारी थोरात, त्यांना मदत करणारे परिचारिका आणि ब्रदर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक यात रणजित सोनवणे, ऋषिकेश मुंडे, स्वाती ठोंबरे, दिपाली नागरगोजे, वंदना भोसले, शितल कोठुळे, रोहित धपाटे, उषा गोपाळघरे, हजारे, जिजाबाई ढाळे, सुलभा हजारे, राजाभाऊ भोसले, शिंदे, काळे, स्नेहल हजारे, जय जोगदंड, विक्की हजारे, अशोक गाडे, यासिन शेख, अतुल थोरात, उमाकांत राऊत रुग्णवाहीका चालक मकरंद घुले, गणेश सूर्यवंशी, अण्णा इंगळे, वैभव काळे या सर्वांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सर्वजण भारावून गेले होते. 


No comments