Breaking News

महिलेचा विनयभंग आरोपी विरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल


दिंद्रुड :  विवाहित महिला कपडे धुण्यासाठी गेली असता एका नराधमाने तिचा विनयभंग केल्याची घटना  दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मंगळवारी घडलीय. 

 मिळालेल्या माहितीनुसार  विवाहीत महिला ही माहेरी आपल्या आई वडिलांकडे राहते. मंगळवारी (दि.एक) सकाळी लवकरच त्या विवाहित महिलेचे आई वडील शेतात गेल्यानंतर त्यांना जेवणाचा डब्बा आणि धुणे धुण्यासाठी कपडे घेऊन ती आई- वडिलांकडे शेतात गेली. दरम्यान धुणे धुत असताना  अंकुश लक्ष्मण तिडके (रा.संगम ता. धारूर) हा तिच्या जवळ आला आणि त्याने वाईट उद्देशाने तिला पकडले असता महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी अंकुशने तेथुन पळ काढला.

 याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विनयभंगाच्या कलमान्वये व अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अंकुश तिडके फरार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहेत.

No comments