Breaking News

माझ्या आठवणीतले साहेब...


सन 2014 साली मी लोकसभा लढवण्याचे ठरवले,

परिस्थिती अतिशय गरीब होती, पण रक्त तरुण होतं,

साहेब लोकसभा लढणार होते तेही भाजप सारख्या मोठ्या पक्षातून याची जाणीव होती. निवडून तर मी येणारच नव्हतो याची शंभर टक्के खात्री होती पण मनात कुठेतरी विचार येत होता की लढायला काय जातय, त्यात पुन्हा अजुन समोर साहेबा सारखा दिग्गज नेता उभा होता, सर्वसामान्यांसारखेच माझ्याही मनात विचार येत होते, एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात उभा राहिल्यानंतर निश्चित आपल्याला खूप त्रास होईल,फार संकटांना सामोरे जावे लागेल. 

ज्या माणसाला 'दैवत' ही उपाधी प्राप्त झालेली आहे,त्या माणसाच्या विरोधात गेल्यानंतर निश्चित लोक माझ्या दारात येऊन छाती बडवून घेतील, मला घाण घाण शिव्या देतील, नाही तो त्रास देतील या सगळ्या गोष्टींची कल्पना आल्यानंतर माझा धीर खचला आणि निवडणुकीतून माघार घ्यायचं ठरवलं,परंतु तोपर्यंत कोणीतरी साहेबांना सांगितलं होतं,की केज तालुक्यातला वडमाऊली दहिफळ मधला एक तरुण तुमच्या विरोधात उभारण्याचे धाडस करतोय लोकसभेला, त्याच दरम्यान थोरात डॉक्टर यांच्या घरी केज येथे साहेबांची आणि माझी भेट झाली,साहेब म्हणले, "तूच का तो श्रीकांत गदळे लोकसभेला उभा राहतोय?,ऐकून छान वाटलं तुझ्यासारख्या तरुणांनी निश्चित राजकारणात यायला हवं.

" मी साहेबांना म्हटलं,'साहेब मी माघार घेतोय मला समाजाच्या विरोधात जायचं नाही' परंतु साहेब म्हणले,"तू कोणाचा विचार करू नकोस,समाजाचाही नाही आणि माझाही नाही तुला राजकारणात खूप स्कोप आहे तू राजकारणात निश्चित मोठा होशील हा माझा आशीर्वाद आहे,त्यामुळे तू निश्चितपणे निवडणूक लढ तुला कोणाकडून त्रास झाला तर मला सांग मी समजावून सांगतो". आणि त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. मला कधीच वाटलं नव्हतं,एवढा मोठा माणूस मला निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन देईल तेही स्वतःच्या विरोधात. साहेबांविषयी चा माझ्या मनातला गैरसमज,माझ्या मनातली निगेटिव्ह इमेज पूर्णपणे चेंज झाली आणि मी निवडणूक लढलो, मतदान कमी झालं पण त्यानंतर एकदा साहेबांची भेट झाल्यानंतर साहेबांनी मला मिश्कीलपणे विचारलं,"काय गदळे,"किती झालं मतदान?", मी म्हटलो,"जाऊद्याना साहेब"असे होते माझ्या आठवणीतले साहेब... मी माझं खरंच भाग्य समजतो साहेब, की मला तुमच्या सारख्या मुरब्बी राजकारण्या सोबत निवडणूक लढण्याची संधी मिळाली... साहेब तुम्हाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

                                               किसान पुत्र श्रीकांत गदळे रा. दहिफळ वडमाऊली ता. केज जिल्हा. बीड मो.7798607054


No comments