Breaking News

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त पाचशे लोकांची तपासणी-- डॉ. लक्ष्मण जाधव

बीड :  बीड लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी सप्तवर्षं पूर्ती या निमित्ताने डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी गोरगरि पाचशे लोकांची केली तपासणी निमित्ताने भाजपा भटके - विमुक्त आघाडी बीड जिल्हा वतीने सेवा सप्ताह राबवण्यात येत असून आज प्रथम दिवशी १ जून मंगळवार रोजी सकाळी :-९ वा. आरोग्य शिबीराला सुरुवात झाली. 

यावेळी कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अभिजीत योगे सर, पोटाचे विकार -सोनोग्राफी तज्ञ डॉ केशव कुल्थे व दंतरोग तज्ञ  यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीराला सुरवात केली मोफत विविध आजारांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आली,दुपारी दोन वाजेपर्यंत ५६१ रुग्णांना तपासण्यात येऊन प्रत्येकाला गोळया-औषधे, N-95 mask, sanitizer,Arsenic Album-30 medicine वाटप करण्यात आली तसेच नगर पालिका कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना PPE kit, surgical gloves वाटप करण्यात आले तसेच post covid patient यांची तपासणी केल्यानंतर ज्यांना  त्रास असेल अश्या रुग्णांना अंबाजोगाई किंवा इतर ठिकाणच्या जन आरोग्य योजनेचे हाँस्पिटल या ठिकाणी पाठविण्यात आले. 

तसेच करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने अनेक संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले भाजपा भटके - विमुक्त आघाडी बीड जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा नेते विलास बामणे, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर,जेष्ठ समाजसेवक सतपालजी लाहोर,भाजपा ता. उपाध्यक्ष समाधान शेलार,भाजपा भटके-विमुक्त आघाडी शहराध्यक्ष नागेश पवार,भाजपा मिडीया सेल जिल्हाध्यक्ष अमोल वडतीले,युवा नेते दत्ता परळकर,नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास काळे,युवा नेते ज्ञानेश्वर हिंगमीरे, सतिश जाधव,विकास गाताडे,संभाजी गायकवाड,नजीर शेख, छगन गुंजाळ (फौजी) आदी. शेकडो जणं उपस्थित होते. No comments