Breaking News

संपादक रविंद्र तहकीक हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन !

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

नारायण राणे समर्थकांनी औरंगाबाद येथील संपादक रविंद्र तहकीक यांच्या कार्यालयात जाऊन धुडगूस घालत हल्ला करून काळे फासण्याचा निंदनीय आणि लोकशाहीला अशोभनीय प्रकार केला आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या आणि पत्रकारिता क्षेत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला करणारा हा भ्याड हल्ला आहे.या प्रकरणी जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भारतकुमार पानसंबळ यांचे सह बबनराव देशमुख, विजयकुमार गाडेकर, अशोक भांडेकर,युवराज सोनवणे, गोकुळ पवार, सतिष मुरकुटे, नवनाथ येवले, बाळकृष्ण मंगरूळकर, राम कांबळे, अशोक शिंदे, प्रमोद निकम, राज कातखडे, मनोज परदेशी, विकास पाटील, यांनी केली आहे.

तसेच यावेळी दुसऱ्या निवेदनात.....

पत्रकारांचे लसीकरण करण्यात यावे !

कोरोना काळात स्वताचा जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे काम पाहणाऱ्या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना दुसऱ्या दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


No comments