Breaking News

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी प्रा.प्रविण फुटके यांची निवड


परळी वैजनाथ :    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी येथील प्रा.प्रविण फुटके सर यांची निवड करण्यात आल्याबद्दल लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराजन रंग मंदिर परळी येते फुले-आंबेडकरीअभ्यासक भगवान साकसमुद्रे यानी सत्कार केला. 

               महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत. यामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रा. प्रविण फुटके यांची प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.प्रविण फुटके व अतुल बेंडे यांनी शनैश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले. जिल्ह्यातील पहिला वधूवर पालक परिचय मेळावा यशस्वी पणे घेतला. तसेच कोरोना काळात समाजातील गोरगरीब लोकांना समाजातील दानशूरांना एकत्र करून मदत केली या कामाची दखल घेत निवड केली आहे. यासंदर्भात नुकतेच नियुक्ती पत्र मेलद्वारे प्राप्त झाले आहे. या नियुक्ती बदल  अनंत इंगळे, प्रा राजू कोकलगावकर,भगवान साकसमुद्रे, रवि मुळे,  महादेव गित्ते,विकास वाघमारे, आदी उपस्थीत होते. 

No comments