Breaking News

देवळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील मौजे देवळा येथे  दिनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळ अंबा  आणि देवळा श्रमकरी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या  संयुक्त विद्यमाने जागतीक पर्यावरण दिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन दि.5 जून 2021 रोजी साजरा करण्यात आला.

या वेळी शेतकऱ्यांना शेती आणि पर्यावरण यांचा संबंध शेतकरी या नात्याने पर्यावरणासाठी काय करू शकतो यावर शास्त्रज्ञ प्रमोद रेणापूरकर यांनी मार्गदर्शन केले. तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्व आणि  बीजप्रक्रिया  चे महत्व व बीजप्रक्रिया कशी करावी या विषयी सखोल माहिती दिली. तर गृहविज्ञान विभागाच्या भरड मॅडम यांनी परसबागाचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.  रवींद्र देवरवाडे यांनी शेतकऱ्यांनी पर्यावरणासाठी काय केले पाहिजे या विषयी माहिती देऊन बीज उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया यांचे महत्व सांगतीले. या वेळी देवळा श्रमकरी फाउंडेशन आणि ग्रामीण किसान शेतकरी गटाचे सदस्य  उपस्थित होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्र व देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने  वृक्षारोपण करून प्रत्येकांनी पर्यावरण संरक्षनासाठी संकल्प केला. या वेळी अशोक खामकर, महादेव कदम, बाबासाहेब यशवंत, अरविंद कदम, दीपक देशमुख, आण्णा जाधव, जाकेर शेख, भाऊसाहेब खामकर महाराज, विश्वनाथ यशवंत, जेष्ठ नागरीक भानुदास देवरवाडे,  यांनी मते मांडली. या वेळी सामाजिक अंतर ठेवून प्रशासनाच्या नियमाचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.No comments