Breaking News

शिरूरच्या कोविड सेंटरमध्ये गोंधळ घालून केली जनजागृती !

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कसार

 ठरवून दिलेल्या कोविडलेव्हल हटवण्यात महाराष्ट्र नंबर एक वर लवकरात लवकर येण्यासाठी, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या रायगडावरील होणाऱ्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ला साकडे घालून शिरूर येथील कोविडसेंटर मध्ये 5 जून रोजी शासकीय समाज कल्याण वसतिगृह मुलींचे येथे ऑक्सिजन साठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड करून ग्रामीण कलाकारांनी आपल्या कलेचा अविष्कार सादर करून समाज प्रबोधन पर देवीचा जागर गोंधळ घातला.


या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक गवळी,पंचायत समिती विस्तार अधिकारी बागडे.प्राध्यापक केशव भागवत सर.मा वैष्णवी सेवाभावी संस्था सचिव तथा पत्रकार विष्णू सव्वाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा वैष्णवी  बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कान्होबाचीवाडी च्या वतीने वासुदेव,बहुरूपी, भारुड,अभंग निरूपण  आधी कार्यक्रम वेळोवेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग  मुंबई च्या नियम आधिन राहून कोविड जण जागृती करण्यात आली आहे. तसेच विविध कलेच्या स्वरूपात पेशंटचे मनोधर्य वाढण्यासाठी आराध्य देवी-देवतांना तुळजा भवानी मातेला साकडे घालून महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी मोठे अनमोल सहकार्य केले आहे.

कलाविष्कार ग्रामीण गोंधळी कलाकार दोन तीन च्या व्यक्ती समूहाने लक्ष्मण बनसोडे,कौसाबाई जाधव,सुशिलाबाई जाधव,सखाराम शिंदे, गयाबाई तावरे,महादेव धनवडे,पार्वती मुळे, रामकिसन मुलाखे, रावसाहेब कांबळे, अर्जुन मोरे इत्यादींनी कला सादर करण्याचे योगदान दिले. कोरोना बाधित विक्रम मुरगुड , किसन सिरसाट यांनी जागेवर तल्लीन होऊन संबळाच्या तालावर आशेची नवीन ज्योत पेटवून कोरोना मुक्त होऊन भक्ती गीते गाऊन मनमुराद आनंद लुटला. भयभीत असलेल्या सर्व पेशंटचे मनोधर्य वाढून इम्मुनिटी पावर प्रबल केली. 

यावेळी डॉ किशोर खाडे ,डॉ सुहास खाडे, डॉक्टर सानप मॅडम covidसेंटर हॉस्पिटल मॅनेजर डॉक्टर राठोड, अमोल कुलकर्णी,जरांगे सर्व पत्रकार पोलीस बांधव उपस्थित होते. शेवटी देवीची भैरवी, आरती पारंपारिक पद्धतीने घेऊन बलभीम महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक केशव भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण कलाकारांना उपजीविकेचे साधन म्हणून व्यासपीठ मिळण्यासाठी शोकांतिका व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार मानले.


No comments