Breaking News

मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या निर्णया विरुद्ध केज येथे रिपाइंची तीव्र निदर्शने होणार

गौतम बचुटे । केज

मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या निर्णया विरुद्ध केज येथे रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील पदोन्नती संदर्भात राज्यशासनाने निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.: त्या नुसार मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णय घेऊन ३३% जागा राखीव ठेवल्या होत्या.- परंतु दि. ७ मे २०२१ रोजी राज्य शासनाने तडकाफडकी त्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण आणि त्यांच्यात नैराश्य व भीतीचे वातावरण पसरले आहे. या राज्य सरकारच्याया निर्णयाचा निषेध ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर करण्यात येत आहे. 

रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या आदेशानुसार आणि तालुका अध्यक्ष दिपक (भाऊ) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष होवर्धन वाघमारे, सरचिटणीस गौतम बचुटे व उपाध्यक्ष बाळसाहेब ओव्हाळ व विकास आरकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केज तहसील कार्यालया समोर दि.४ जून शुक्रवार रोजी दुपारी १२:३० वा. निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलना संदर्भात कोरोना आणि साथरोगाच्या सर्व क्तई व नियमांची।काटेकोर अमंलबजावणी करून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दीपक कांबळे यांनी दिली आहे.


No comments