Breaking News

महारथी कर्ण क्रीडा व्यायाम शाळेच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

ब्रम्होउच्चाराच्या जयघोषात पंचामृताचा महाप्रसादाचे वाटप

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा येथील महारथी कर्ण व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली पानसंबळ यांनी येथील संभाजी चौकात ब्रम्होउच्चाराच्या जयघोषात पंचामृताच्या महाप्रसादाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती संभाजी चौक येथे स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

प्रथम ब्रम्होउच्चाराने प्रतिमा पूजन करण्यात आले त्या नंतर दुग्ध अभिषेक करून सर्व उपस्थितांचे पंचामृत प्रसादाने तोंड गोडं करून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य पती रामदास बडे, रामनाथ कांबळे,राष्ट्रवादीचे युवा नेते विनोद पवार,विवेक पाखरे , महेश उगलमुगले, गोकुळ पवार, प्रताप कातखडे, प्रकाश साळवे, भागवत बारगजे, दत्ता भुजबळ, रमेश शिरसाठ, प्रल्हाद विघ्ने, अमोल चव्हान, आंगद पानसंबळ,राजू खामकर उमेश सुरवशे,आजिनाथ धोत्रे स्वप्नील खेडकर,अशोक इंगळे, बाळू पवळ,कृष्णा थोरात, शरद पवार , राजेंद्र काटे, उमेश सुरवसे, भूषण खेडकर,भाग्यश देवा कुलकर्णी,भैय्या पवार यांच्या सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments