Breaking News

मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी बहुजन युवकांची शहरात रॅली


5 जुनला बीड शहरात युवा शक्तीचा एल्गार होणार : प्रशांत डोरले

बीड :   गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मा.आ.विनायकराव मेटे संघर्ष करीत असून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजबांधवांची जनभावना आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध निर्णय आल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून आ. विनायकरावजी मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने आरक्षण व अन्य मागण्यांसाठी बीड शहरामध्ये दि.5 जून रोजी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,  त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जनभावना असणाऱ्या बहुजन समाजाने देखील या मोर्च्यात सहभागी होऊन मोठा भाऊ असणाऱ्या मराठा समाजाला साथ द्यावी असे आवाहन करण्यासाठी शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करत बीड शहरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये सर्व प्रथम आरक्षणाची तरतूद करुन मागासलेल्या जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. आज देशाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू असताना मराठा समाजातील शेतकरी, युवक व विद्यार्थी सह अन्य समाज बांधवांची दैनिय अवस्था झालीय. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाची स्थिती मराठ्यांवर ओढावली आहे. मराठ्यांवरील मागासलेपण दूर करून त्यांना ही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची मराठा समाजाला आज गरज असून आरक्षणासाठी मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अशी जनभावना तमाम बहुजन समाजात आहे. 

मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने आज पुन्हा रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ मराठा समाजावर आलीय.आ.विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनला बीड मध्ये मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. हा केवळ मोर्चा नसून आरक्षणाच्या लढ्यासाठी मोर्चा आहे. ही बघण्याची वेळ नसून मोर्च्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याची वेळ असल्याने बीड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही मोटारसायकल रॅली काढत असल्याचे शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी सांगितले, तसेच ओबीसी, मुस्लिम, इतर मागासवर्गीय समाजाने मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाच्या या संविधानिक लढाईत त्यांना साथ देऊन आरक्षणाच्या मोर्च्यात सहभागी होवून पाठींबा द्यावा, असे आवाहन ही शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलेले होते.

शिवसंग्राम भवन येथून सुरू झालेली ही रॅली शाहूनगर, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज परिसरातुन मार्गस्थ होत महापुरुषांच्या स्मारकास हार अर्पण करून शिवसंग्राम भवन येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाने समारोप करण्यात आला. यावेळी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, नितीन आगवान, गणेश धोंढरे, शेषेराव तांबे, मनोज जाधव, राहुल गायकवाड, शेख शकील, कुतुब भाई, आबेद शेख, प्रकाश जाधव, परशुराम जाधव, हरीश शिंदे, अनिकेत देशपांडे, अक्षय माने, सौरभ तांबे, प्रेम धायजे, अर्जुन यादव सह अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व युवक उपस्थित होते.No comments