Breaking News

केजमध्ये समाज सेविकेचा विनयभंग

गौतम बचुटे । केज 

तू मला आवडतेस. तू आमच्या सोबत लग्न कर अन्यथा तुला मारून टाकू. अशी धमकी देत केज तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पंचवीस वर्षीय समाजसेविकेचा  विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ७ जून रोजी सायं ६:३० वा च्या दरम्यान दोन आरोपींनी एका सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीस दोघांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून; तू मला आवडतेस. तू आमच्या सोबत लग्न कर. असे म्हणून चिंचोली माळी फाट्यावर बोलावून घेतले. त्या नंतर ती तरुणी बोलावलेल्या ठिकाणी मुद्धाम गेली असता; तू आमच्या सोबत फिरायला चल. अन्यथा जीवे मारून टाकू. अशी धमकी देत तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. 

घटनेनंतर त्या पीडित महिलेने केज पोलीस ठाणे गाठून त्या दोन नराधमांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या तक्रारी वरून धनंजय भिमराव गालफाडे व एक अनोळखी इसम या दोघांच्या विरुद्ध गु.र.नं. २८२/२०२१ भा.दं.वी.३५४(अ) ५०६, ५०७ आणि ३४ नुसार विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.


No comments