Breaking News

माणिकनगर भागातील बोअर तात्काळ दुरुस्त करा त्रस्त नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

परळी : परळीच्या माणिकनगर भागात वाकडे यांच्या घराशेजारी असलेला बोअर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. नगर पालिका प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन बोअर दुरुस्त करावा अशी मागणी एका निवेदनाच्या द्वारे या भागातील नागरिकांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे यांच्यासह नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माणिकनगर भागांतील वाकडे यांच्या घराशेजारी असलेला बोअर बंद आहे, त्याचबरोबर आसपास असणारे सर्व हातपंपसुद्धा बंद आहेत. नागरिकांची पाण्यासाठी फरपट होत असल्याने या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या नगर परिषदेने तात्काळ सोडवावी अशी मागणी केली आहे. सदरील निवेदनावर माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे यांच्यासह प्रशांतकुमार शास्त्री, सुरेश जाधव, रोहित सारडा, वैजनाथ पांढरे, शंकर जाधव, कृष्णा बेदरकर, सौ.अस्मिता शास्त्री, ईश्वर राऊत, रवी सदरे, महेश बिडवे, गणेश सूर्यवंशी, हरी फपाळ, संजय सुरवसे, भागवत कासुडे, चंद्रकांत गरड, गोविंद पुट्टावार, दिगंबर तपसे, दत्ताभाऊ वाकडे, महादेव वाकडे, शिवाजी दंदे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


No comments