Breaking News

मॅट्रीकेत्तर मिळणारी शिष्यवृत्ती पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत देण्याची गरज - ॲड. भाग्यश्री ढाकणे


खा. प्रितम मुंडे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी

आष्टी : राज्यातील ओबीसी,नोमॅडिक ट्राईब,शेड्युल ट्राईब,स्पेशल बॅकवर्ड क्लासेस या प्रवर्गात बी.सी.ए,बी.बी.ए या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप शासनाने थांबविले असून सदरील शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी आणि या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड थांबवावी अशी मागणी भाजपा भटके विमुक्त युवती प्रदेशाध्यक्षा ॲड भाग्यश्री ढाकणे यांनी खासदार तथा इतर मागासवर्गीय संसदीय समितीच्या सदस्या डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सदरील अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी सुरळीतपणे शिष्यवृत्ती देण्यात येत होती.या वर्षी मात्र अचानकपणे शिष्यवृत्ती थांबविण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे.शासनाने झेड वर्ग दर्जात समाविष्ट केलेल्या या अभ्यासक्रमांमुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडून देण्याची वेळ येणार आहे.त्यामुळे शासनाने सदरील मागणीचा फेरविचार करून पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत शिष्यवृत्ती सुरू ठेवण्याची मागणी  देखील ॲड भाग्यश्री ढाकणे यांनी निवेदनात केली आहे.


No comments