Breaking News

साळेगाव येथे शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील साळेगाव येथे शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.

६ जून रोजी शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक होऊन ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार साळेगाव ग्रामपंचायतीत शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी सरपंच कैलास जाधव यांच्या शुभहस्ते स्वराज्य ध्वज व स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, पांडुरंग इंगळे, रवींद्र जोगदंड, रामेश्वर शिंदे, शिव सेनेचे प्रसिद्धी प्रमुख ज्योतिकांत कळसकर, संभाजी शिनगारे, गजानन इंगळे, सुधाकर इंगळे, भाऊ मेडकर, सर्जेराव लांडगे, रामदास येळवे, अतुल जाधव, अविनाश इंगळे, अंगणवडीच्या सुनंदाताई बचुटे, श्रीमती मुळेताई, श्रीमती सय्यद, श्रीमती विघ्ने, समाधान इंगळे, अमोल वैरागे, हनुमंत राऊत आणि पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते. 


No comments