Breaking News

विद्युत खांबाच्या ताणाला कंरट उतरल्याने बैलाचा जागीच म्यृत्यृ!


-नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी!

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

बीड तालुक्यातील बेलुरा येथील शेतकरी वैजिनाथ बाबूराव गवते यांच्या मालकीचा बैल बेलुरा s/s अंतर्गत येणाऱ्या साक्षांळ पिंप्री गावठाण फिडर वरती येणाऱ्या महादेव Dtc वरील 4 7 pole च्या stay wire ला चिटकुन म्यृत्यृ पावला आहे.हि घटना शुक्रवार दि.४ रोजी बीड तालुक्यातील बेलूरा येथे घडली आहे.

थोडक्यात माहिती अशी की वैजिनाथ बाबुराव गवते रा.बेलुरा यांच्या मालकीचे आसलेले बैल व गाडी गावामधुन शेताकडे जात असताना घरापासुन काही हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला आसलेल्या विद्युत पोलच्या ताणाला करंट उतरला.यावेळी एक बैल चिटकला व गाडीमध्ये दुसरे व्यक्ती होते माञ प्रसंगावधान राखत सर्वजन गाडीमधुन बाहेर पडले.सध्या पाऊस काळ झाल्याने जागोजागी पाणी साचत आहे.त्यामुळे करंट मोठ्या प्रमाणात उतरला जात आहे.यावेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे.तर तलाठी कुलकर्णी यांनीही पंचनामा करुन पुढील कारवाई केली आहे.तसेच पशु वैद्यकीय अधिकारी खाडे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पिएम केले.व वन्यप्राण्यासाठी त्या बैलाला जेसीबीने खड्डा खोदुन आधिकाऱ्यां समक्ष गाडुन टाकण्यात आले.

नुकसान भरपाईची मागणी!

पाऊस पडायला लागला आहे.त्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी बैलाची निंतात गरज आहे.याअणुषंगाने शेतकरी वैजिनाथ यांनी आत्ताच काही दिवसापुर्वी १ लाख रुपयांची बैल जोड घेतली होती.त्यातील एक बैल करंट लागल्याने म्यृत्यृ पावला आहे.त्यामुळे ऐण खरीपात त्यांच्यावर मोठे संकट पडले आहे.तेव्हा शेतीच्या कामासाठी बैल घेण्यासाठी नुकसान भरपान देण्याची मागणी वैजिनाथ गवते यांनी केली आहे.No comments