Breaking News

इंजिनियर एम.एन.बडे यांची लोकनेत्याला आगळीवेगळी आदरांजली


कोरोना सेंटर मधील रुग्णांना अंघोळीच्या बाथरूमसाठी दिला पंचवीस हजारांचा धनादेश

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार 

तालुक्यातील प्रसिद्ध इंजिनियर एम.एन.बडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आगळ्यावेगळ्या पध्दतीने आदरांजली अर्पण केली आहे.

शहरातील सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संचलित कोरोना केअर सेंटर मध्ये आज एम.एन.बडे यांनी आज पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.सध्या या केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांना अंघोळीच्या बाथरूमची गैरसोय होऊ नये म्हणून इंजि.एम.एन.बडे (वारणी) यांनी स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दोन बाथरूमला लागणारा खर्च 25 हजार रुपयेचा धनादेश सुपूर्द केला.या वेळी राजाभाऊ शेळके समन्वयक, नाम फौंडेशन, रमेश शिरसाठ सर, प्रल्हाद विघ्ने सरपंच, भागवत बारगजे,महेश उगलमुगले, राजकुमार पालवे हे उपस्थित होते.


No comments