Breaking News

मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य आत्माराम चांदणे यांनी केले : ॲड. कारके

बोद्धीवृक्ष लाऊन सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती साजरी 

गेवराई :  गेवराई तालुक्यातील डीपीआयच्या वतिने सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती मोठ्या थाटामाटात करण्यात आली. शहरातील मातंग   स्मशान भुमित बोद्धी वृष लाऊन   जंयती साजरी करण्यात आली तसेच मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं सृतीषेश आत्माराम चांदणे यांनी केले असल्याचे प्रतिपादन अॅड सोमेश्वर कारके यांनी केले आहे.

    शहरातील डीपीआय च्या तालुका कार्यलयात अभिवादन करतांना ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष संजय सुतार , महादेव भिसे , सय्यद माजेद , अमोल सुतार , अक्षय सुतार , विजय सुतार , अर्जून सुतार , यांची प्रमुख उपस्थिती होती . समस्थ महाराष्ट्रात मातंग समाजानी तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर मातंग समाजानी चालले पाहीजे समाजाला निळ्या झेंड्याखाली आल्याशिवाय पर्याय नाही म्हणुन स्वत: धम्माची दिक्षा घेत मातंग समाजासमोर शांतीचा मार्ग ज्यांनी सांगितला अश्या भगवान बुद्ध व राज्यघटनचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या जिवन मार्गावर चालल्याने आपली प्रगती होईल . हे त्यांनी संपुर्ण समाजाला सांगितले आहे तरी आपण त्यांच्या जन्मदिनी बोध्दी वृष लाऊन त्यांची जंयती साजरी केली आहे त्यांचे विचार आपण तळागळा पर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असेही अॅड सोमेश्वर कारके यांनी सांगितले यावेळी अमोल कारके , साईनाथ सुतार , आबा भिसे , नामदेव भिसे , सचिन धुंरधरे , आकाश सुतार , सुरेश सुतार , शांतीलाल सुतार , विशाल सुतार , अविनाश आव्हाड , जिंतेद्र रोकडे , अभिजीत शिंदे , यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते. 

No comments