Breaking News

साळेगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

गौतम बचुटे । केज 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी केज तालुक्यातील साळेगाव येथे साजरी करण्यात आली.

केज तालुक्यातील साळेगाव येथे भगवान बाबा मंदिरातील सभा मंडपात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, रामेश्वर शिंदे, श्रीमंत गित्ते, अशोक गित्ते, बालासाहेब बचुटे, ज्योतिकांत कळसकर, भागवत मुळे, अर्जुन गित्ते, रामू गित्ते, जयराम तिडके, ज्ञानोबा गित्ते, राजकुमार गित्ते, गोविंद टोपे, भाऊ मेडकर, अक्षय गित्ते, सुधाकर इंगळे, हरिभाऊ गित्ते, रामलिंग गित्ते, महारुद्र गित्ते, मल्हारी गित्ते उपस्थित होते. उपस्थितांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


No comments