Breaking News

कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने वैकुंठ भुमित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

 


किल्लेधारूर :  शहरातील सामाजिक संस्था कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वैकुंठ भुमीत वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षापासुन वैकुंठ भूमी ही येथे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करत आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वैकुंठ भुमी येथे पिंपळाचे दोन झाडे, पिंपरीचे दोन व उंबराचे एक असे एकूण पाच झाडे लावण्यात आले. वैकुंठ भूमीच्या परीसरात सिताफळांच्या एक हजार बियांची लागवड करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.


  कायाकल्प फाऊंडेशन सामाजिक संस्था सातत्यपूर्ण पर्यावरण चे कार्य करत आहे संस्था माध्यमातून वैकुंठ भूमी येथे व त्याच्या परिसरात वृक्ष लागवड करत संगोपन करत आहे  दर वर्षी प्रमाणे या ही पर्यावरण दिना निमित्ताने ५ वृक्ष सहित एक हजार सीताफळ बियांचे रोपण केले तसेच किल्ले धारूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक तथा कायाकल्प फाऊंडेशन सदस्य अशोकजी लोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्यावर्षी लावलेल्या झाडांची प्रगती दिसून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

     यावेळी आदर्श शिक्षक अशोकराव लोकरे, शाकेर सय्यद, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, विश्वानंद तोष्णिवाल, दत्ताभाऊ गोंदणे, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, गजानन पवार, सचिन चिद्रवार, अक्षय बगाडे, गणेश कापसे, विशाल देशमाने, सचिन बगाडे व जलदुत विजय शिनगारे, बालसदस्य अथर्व कामाजी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

No comments