Breaking News

बाबासाहेब गित्ते यांना लेखा परीक्षक वर्ग-१ पदी पदोन्नती

गौतम बचुटे । केज 

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील वर्ग-२ लेखा परीक्षक बाबासाहेब गित्ते यांना लेखा परीक्षक वर्ग-१ पदी पदोन्नती मिळाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील बाबासाहेब गित्ते हे नवी मुंबई सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात लेखा परीक्षक वर्ग-२ पदी कार्यरत होते. त्यांना लेखा परिक्षक वर्ग-१ पदी पदोन्नती मिळाली आहे. अत्यंत मनमिळावू व कामसू वृत्तीचे ते असून सामाजिक कार्यात देखील ते हिरहिरीने सहभागी होत असतात. अडीअडचणीच्या प्रसंगी ते अनेकांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 

विभागीय सहनिबंधक (लेखा परीक्षण) अधिकारी रा. स. शिर्के यांच्या सहिनीशी बाबासाहेब गित्ते यांच्या पदोन्नतीचा आदेश निर्गमित झाला असून चिपळूण येथे बदलीने रिक्त होत असलेल्या लेखा परिक्षक वर्ग-१ पदी त्यांना रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. 

बाबासाहेब गित्ते यांच्या पदोन्नती बद्दल अशोक गित्ते, सेवा निवृत्त कॅप्टन रावसाहेब बचुटे, अर्जुन गित्ते, वैजिनाथ नेहरकर, कुमार भांगे, बलभीम बचुटे, रवींद्र जोगदंड, आश्रूबा गित्ते, राजकुमार गित्ते, नाना राऊत, भारत बचुटे, अँड. किशोर आरडकर, दशरथ गित्ते, प्रा. डॉ. संतोष गित्ते, इंजि. कल्याण बचुटे, लेखा परिक्षक परमेश्वर मुंडे, संतोष गित्ते आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments