Breaking News

स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.वनमाला गुंडरे(रेड्डी) रुजू


परळी वैजनाथ :  येथील थर्मल विभागातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. वनमाला गुंडरे (रेड्डी) मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 

                   स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने नूतन प्राचार्या गुंडरे मॅडम यांचे छोटेखानी स्वागत करण्यात आले तसेच मावळते प्राचार्य डॉ.गोपाळराव काकडे यांना निरोप देण्यात आला‌.  गुंडरे मॅडम यांना प्राचार्य पदावरील कामाचा प्रदीर्घ अनुभव असून यापूर्वी त्यांनी अंबाजोगाई येथील मशिप्रमं च्या यशवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून प्रदीर्घकाळ सेवा बजावली आहे.                                              याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या नियुक्तीबद्दल मशिप्रमं चे अध्यक्ष आ‌. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आ. सतीशभाऊ चव्हाण, शालेय समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके (काका )यांचे आभार मानले‌. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली.                       याप्रसंगी मशिप्रमं चे सदस्य तथा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अजय सोळंके सर, न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एच.शेंडगे सर, उपप्राचार्य सुनिल लोमटे सर, तसेच स्वामी विवेकानंद  महाविद्यालयाचे प्रा.भगवान कदम, प्रा श्रीहरी गुट्टे तसेच इतर कर्मचारी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून उपस्थित होते.


No comments