Breaking News

घरासमोर उभ्या केलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीची चोरी

प्रतिकात्मक

गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील कोरेगाव येथे घरा समोर उभ्या केलेल्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉली चोरून घेऊन गेलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की दि. ३० मे रोजी दुपारी ३:०० वा. च्या दरम्यान संतोष राजेंद्र तांदळे याने कोरेगाव तालुका केज येथील त्याच्या घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली क्र. (एम एच- २३/सी-६५६२ आणि एम एच-२३/सी- ५८७९) या सुमारे ३ लाख रु. किंमतीच्या ट्रॉली या गावातीलच संतोष अभिमान घुले व त्याचे तीन साथीदार यांनी चोरून नेल्या आहेत. 

या प्रकरणी संतोष तांदळे यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७३/२०२१ भा.दं.वि. ३७९ आणि ३४ नुसार संतोष अभिमान घुले व अन्य तीन साथीदारांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धनपाल लोखंडे हे करीत आहेत. 

No comments