Breaking News

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांनी उद्याच्या विशेष लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा - राजेंद्र लाड

आष्टी :  जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परीषद बीड यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विशेष लसीकरण मोहिमेचा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या दि.२५ मे २०२१ च्या संदर्भिय पत्रान्वये शनिवार दि.५ जून २०२१ हा दिव्यांग बांधवांच्या कोविड - १९ च्या लसीकरणासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असून या दिवशी फक्त ४५ वर्षावरील दिव्यांग बांधवाचे लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार असुन त्यासाठी त्यांना कुठल्याही ऑनलाईन नोंदणीची गरज नाही.तरी बीड जिल्ह्यातील ४५ वर्षावरील दिव्यांगांनी या विशेष लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा.अशी माहिती दिव्यांग हितार्थ शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

            लसीकरणास जाताना दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत घेऊन जावे.सदरील दिवशी फक्त दिव्यांग बांधवांचे लसीकरण होणार असल्याने इतर सर्वसामान्य व्यक्तींचे लसीकरण बंद राहणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये कोविड - १९ संदर्भात विशेष दिव्यांग बांधव लसीकरण मोहीम आयोजित केलेली आहे.लसीकरणा दरम्यान काही अडचणी आल्यास रविंद्र शिंदे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी ९५४५४५६५५५ व डाॅ.सचिन मडावी,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण बीड ७७२०८३९१५५ या क्रमांकावर संपर्क करावा व जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी विशेष लसीकरण मोहीमेत सहभागी होवून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,जिल्हासचिव इंद्रजित डांगे,मधुकर अंबाड,नंदकिशोर मोरे,बाळासाहेब सोनसळे,दत्तात्रय गाडेकर,शेषराव सानप,नवनाथ लोंढे,श्रीम.संजिवनी गायकवाड,श्रीम.वैशाली कुलकर्णी आदींनी केले आहे.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व संपुर्ण बीड जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी,जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. 


No comments