Breaking News

छोट्या व्यवसायिकांना टाळेबंदीतुन सूट द्या - माधव निर्मळ


 धारूर : कोवीड १९ काळात गेल्या दिड वर्षापासून छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे, बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता कमी होत असल्याने टाळेबंदीतून छोट्या व्यवसायिकांना सूट देण्याची मागणी धारूर येथील ज्येष्ठ उद्योजक माधव निर्मळ यांनी प्रसारमाध्यमांना केली आहे. 

     गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोवीड१९ आजाराने सर्वत्र हाहाकार माजवला याच कारणाने प्रशासनाने टाळेबंदी जाहीर केली मात्र बंद असलेल्या व्यवसायामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे व्यवस्थापन कोलमडले आहे त्यातली त्यात कर्ज उभा करून चालू केलेले व्यवसाय यामुळे व्याजाचा डोंगर डोक्यावर असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. व्यावसायिकांचा आर्थिक कणा मोडल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होताना पाहायला मिळत आहे ,छोट्या व्यावसायिकांना आत्महत्या करण्याची वेळ या टाळेबंदी मुळे आली असून बीड जिल्हाधिकारी यांनी टाळेबंदीचे व कोरोना संसर्गाचे जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी उद्योजक माधवराव निर्मळ यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.


No comments