Breaking News

5 जूनला आंदोलन होणारच ही काळ्या दगडावरची रेघ परळी वैजनाथ येथील बैठकीत आ.विनायकराव मेटे यांचे प्रतिपादन

परळी : मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढायचं असा ठाम निर्धार मराठा समाजाने केला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यात शिवसंग्रामचे नेते आ.विनायकराव मेटे यांनी ठिकाणी बैठका घेतल्या येत्या पाच जून रोजी बीड येथे मराठा आरक्षण हा बरोबर समाजाच्या अनेक मागण्यांसाठी भव्य मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. परळी वैजनाथ येथील चेंबरी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे त्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झालाय. हा आक्रोश पाच जून रोजी च्या बीड येथील मोर्चातून दिसून येईल. शासनावर विविध माध्यमातून दबाव आणल्यानंतर ईडब्ल्यूएस त्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शासनाला लाथा घातल्याशिवाय कुठलाही निर्णय केला जात नाही आरक्षणा बरोबरच मराठा समाजाच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी व त्यांना मंजूर करून घेण्यासाठी बीड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. 

या आंदोलनाच्या उभारणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी आम्ही बैठका घेतल्या या बैठका च्या माध्यमातून लोकांना सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. सर्व नियमांचे पालन करून बीड येथील मोर्चा कुठल्याही परिस्थितीत संपन्न होईल ही कळ्या दगडावरची रेघ आहे आतापर्यंतचे मोर्चे मुक्त स्वरूपाचे होते मात्र या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या समस्यांवर आवाज उठवला जाणार आहे असेही आ.विनायकराव मेटे म्हणाले. आज झालेल्या बैठक प्रसंगी अभिजित देशमुख, श्रीनिवास देशमुख, माणिकराव नाईकवाडे, देवराव कदम, यशवंत सोनवणे, कैलास नाईकवाडे, ओम काळे, केशव साबळे, राजू सय्यद, संदीप दिवटे, सुधाकर नाईकवाडे, बालासाहेब पथरकर, भागवत साबळे, अरुण सपाटे, राहुल नाईकवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 


No comments