Breaking News

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आष्टीत उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन


आष्टी :  स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या आवाहना नुसार राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात होणारे हाल लक्षात घेत युवा नेते अजय दादा धोंडे मित्रमंडळाच्या वतीने भगवान महाविद्यालय आष्टी व आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे रविवारी (दि.३०) आयोजन करण्यात आलेले आहे.

          दि.०३ जून रोजी स्व.गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असल्याने व सध्या देशासह राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वत्र रुग्णांना आवश्यक असलेले रक्त मिळणे कठीण झाले आहे. राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रक्त उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे घेणे काळाची गरज असल्याने आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या आवाहना नुसार व भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांच्या वतीने भगवान महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.३० मे २०२१ रोजी सकाळी १० ते सायं.०५ या वेळेत भगवान महाविद्यालय आष्टी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून कोरोना महामारीत सामाजिक कर्त्याव्याची जाणीव ठेवून स्वयंस्फूर्तीने जास्तीत जास्त युवक व नागरिकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते अजय दादा धोंडे यांनी केले आहे.


No comments