Breaking News

प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या वतीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड रुग्णांना शिरखुर्मा वाटप

 

                 

आष्टी :  आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाचे कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आज  दिनांक 17 मे रोजी आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर येथील रुग्णांना ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद च्या निमित्ताने शीरखुर्मा वाटप करण्यात आले.

सव्वाशे रुग्णांनी याचा आस्वाद घेतला. आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्तेच रुग्णांना शीरखुर्मा वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन,परिसेविका बी. शेख, वैद्यकीय स्नातक डॉ.सय्यद हुमायुद्दिन, डॉ.सय्यद वलीउद्दीन डॉ.अमित डोके,अधिपरिचारिका,कर्मचारी यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. 


No comments