Breaking News

शिरूर तालुक्यासाठी 'मोबाईल मेडीकल युनिट'


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरूर कासार तालुक्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत 'मोबाईल मेडीकल युनिट' कार्यान्वित झाले असून आरोग्याच्या सर्व सोईं उपलब्ध असलेल्या या युनिट मार्फत तालुक्याच्या दुर्गंम भागातील गावांसाठी आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. 

शिरूर कासार तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त असलेले मोबाईल मेडीकल युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी व्हॅनची पाहणी केली आणि मोबाईल मेडीकल युनिटच्या सर्व टीमचे स्वागत केले. कोवीड-19 बाबत काळजी घेण्याबाबतच्या सर्व स्टाफला सूचना दिल्या. डॉ. मनिषा सोनवणे, वै.अ. यांनी मोबाईल मेडीकल युनिटच्या सेवांबाबत व त्यातील यंत्र सामग्री बाबत सविस्तर माहीती सांगितली. यावेळी श्री. शेख साहेब, श्री. तिजोरे, वि.अ.(आरोग्य), श्री. भावले साहेब, कुष्ठरोग तंत्रज्ञ, श्री लातुरकर, ता.आ.स., श्रीमती येवले सुषमा, BCM, श्री. नवगीरे, श्रीमती मुळे, श्री. सावंत आणि मोबाईल मेडीकल युनिटचा सर्व स्टाफ उपस्थित होता.No comments