Breaking News

आ. सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघासाठी चाळीस हजार अॕन्टीजन टेस्ट किट उपलब्ध करुन दिल्या

के. के. निकाळजे । आष्टी 

कोवीडच्या कालावधीत अॕन्टीजन टेस्ट किटचा तुटवडा हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.माञ यामुळे साहजिकच टेस्ट होत नाहीत शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची खरी आकडेवारी या किट्स उपलब्ध नसल्याने समोर येत नाही.याच पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघासाठी 40 हजार अॕन्टीजन किट्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.

आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगांव व आष्टी तालुका दुध संघ यांच्या वतीने आष्टी तालुक्यात अॕन्टीजन टेस्ट करणाऱ्या सहा टिम तयार केलेल्या आहेत.त्यामुळे या टिमच्या माध्यमातून आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अॕन्टीजन टेस्टचे कॕम्प होत आहेत.माञ मध्यंतरी प्रशासनाच्या वतीने अॕन्टीजन किट्सचा तुटवडा जाणवू लागल्याने टेस्टची प्रक्रिया थांबल्याचे चिञ होते. 

याच पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघ यांच्यावतीने 40 हजार अॕन्टीजन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्याने आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात रविवार दुपारपासून अॕन्टीजन कॕम्पला सुरुवात देखील झाली.या आलेल्या 40 हजार अँटीजन टेस्ट किट्स आ. सुरेश धस यांच्या उपस्थितीत तहसिलदार राजाभाऊ कदम, सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, ना. तहसिलदार प्रदिप पांडूळे, युवानेते सागर धस,सुनील रेडेकर, माऊली जरांगे, सागर धोंडे, डाॕ. नागेश करांडे यांच्या हस्ते अॕन्टीजन टेस्ट करणाऱ्या टिमकडे सुपुर्द करण्यात आल्या.


No comments