Breaking News

कायकल्प फाउंडेशनच्या वतीने सिताची नहाणी परिसरात स्वच्छता अभियान

    किल्लेधारूर:  शहरातील आसरडोह रोडला सिताची नहाणी हे ऐतिहासिक ठिकाण असल्याने  या भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली होती ती रविवारी कायाकल्प फाऊंडेशन वतीने स्वच्छता मोहीम करण्यात आली. 

   

  किल्लेधारूर येथील सीताची नहानी या परिसरात कोरोना महामारीमुळे व शासनाच्या लाॅकडाऊन या नियमाचे पालन करण्यासाठी दहाव्या चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत.


 पण मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी अस्वच्छता किल्ले धारूर शहरातील पत्रकार हरिभाऊ मोरे यांनी या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्याची सक्त गरज असल्याचे आव्हान केले त्यांना प्रतिसाद देत आज सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत या परिसरातील काटेरी गवत, चिलारी, पाण्यातील गवत, दारुच्या बाटल्या, बिसलरी बाॅटल,  प्लास्टिक ग्लास अशी सापसफाई करत हा परिसर स्वच्छ केला.  आजच्या स्वच्छता अभियानात पत्रकार हरिभाऊ मोरे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, गणेश कापसे, अक्षय बगाडे व विजय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

No comments