Breaking News

प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरु करा-पं. स.सदस्य ऍड. प्रकाश बडे


शिरूर कासार :  तालुक्यात सध्या कडक निर्बंधांतर्गत पूर्णपणे बंद पाळला जात आहे.परंतु लसीकरण करण्यासाठी अनेक गावातील लोकांना शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहेत. ज्या मुळे एकाच ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होत आहे.

शिरूर कासार तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोणी येथील उपकेंद्रात लोक लसीकरण करण्यासाठी जात होती.

परंतु प्रशासनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आजच्या परिस्थितीत गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या प्रशासनाच्या वतीने शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम चालू आहे.परंतु त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.हीच प्रचंड गर्दी कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकते.तसेच वयोवृद्ध लोकांच्या जाण्या-येण्याचाही प्रश्न उद्भवत आहे.त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून गावोगावी लसीकरण मोहीम राबवावी असे पं.स.सदस्य प्रकाश बडे यांनी तहसिलदार यांना निवेदना द्वारे केली आहे. 


No comments