Breaking News

आ. बाळासाहेब आजबेंच्या आदेशाने ग्रामीण रुग्णालयात आले पिण्याचे पाणी

आष्टी : आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात सुरू असलेल्या कोव्हिड सेंटर येथे मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. पाण्याच्या टाक्या असून देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने आरोग्य अधिकारी व रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती. मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आ आजबे यांनी बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या सदस्यांना आदेशीत करून रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यास सांगितले. 

          मंगळवार दि 18 मे रोजी आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुंबरे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथील रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली. कोरोना काळात आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने जिथं कमी तिथं आम्ही या वृत्तीप्रमाणे काम केले जात आहे. कोरोना रुग्ण, त्याचे नातेवाईक, आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी आदींना सर्वोतोपरी मदत मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे सुरू असलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी निवारा टाकणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय करणे, औषधांचा तुटवडा झाल्यास तो पुरविणे आदी सामाजिक कार्य आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहेत.

No comments