Breaking News

सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी अंबादास गुजर

बीड ः महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबईच्या बीड जिल्हा समन्वयकपदी मंझरी हवेली (ता.बीड) येथील सरपंच अंबादास गुजर यांची निवड करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी अंबादास गुजर यांना निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी संघटनेचे विश्‍वस्त पांडुरंग नागरगोजे, शिलाताई अघाव यांची उपस्थिती होती.
राज्यातील ग्रामपंचायत व सरपंचांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून अंबादास गुजर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी सरपंचांच्या प्रश्‍नावर शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या कार्याची दखल घेवून संघटनेने त्यांची जिल्हा समन्वयकपदी निवड केली. गावाच्या विकासासाठी योगदान देणार्‍या सरपंचांच्या प्रश्‍नावर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्याबरोबरच संघटनेच्या विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंबादास गुजर यांनी म्हटले आहे. निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, राज्य महिला अध्यक्ष राणी पाटील, राज्य महिला उपाध्यक्ष अश्‍विनी थोरात यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments